
महापालिका नालेसफाई कधी करणार ?
हडपसर
पूर्व मोसमी पावसाने पुण्याची दाणादान उडाली तरीही महापालिका अजून नालेसफाईच्या कामात जागी झालेली नाही. हडपसर मधील लेंडी ओढा, जळका वाडा सह नाल्यांची अद्याप सफाई सुरू केली आहे. हे काम 70 टक्के पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण ठेकेदार नाल्यातील गाळ कचऱ्याचे ढीग नाल्यातच बाजूला ठेवत आहे. काही ठिकाणी नाल्या मधील कचरा त्याच ठिकाणी पसरावला जात आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे पुन्हा हा गाळ नाल्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदार त्यांचा खर्च वाचून नफा कमवायच्या नादात हडपसर करांचा जीव धोक्यात घालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पावसाळ्यात संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरूने यासाठी महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. हे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले होते ते सात जून पूर्वी पूर्ण केले जाणार आहे ज्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे असे कलवड अन्य ठिकाणी प्राधान्याने नालेसफाई सुरू आहे. मात्र या कामासाठी कमी दराच्या निविदा आल्या आहेत म्हणजे महापालिकेने या कामासाठी जेवढा खर्च अपेक्षित धरला होता त्यापैकी हे ठेकेदार तीस ते पन्नास टक्के कमी खर्चात हे काम करून देतात. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अधिकारी आम्ही काम चांगल्या पद्धतीने करून घेणार असा दावा करत होते.
गंभीर अवस्था हडपसर येथील जळक्या ओढ्यातील आहे या ओढ्यातील राडाराडा अजून काढलेला नाही त्यामुळे ओढ्याचा अर्धा प्रवाह बंद आहे महापालिकेच्या मुलांना मलनिःसारण न विभागाच्या अधिकारी अभियंते केवळ कागदपत्रे काम झाल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नाल्यातील स्थिती गंभीर आहे ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्याने ते थातूर मजूर कामे सुरू आहेत पण ज्यांच्यावर हे काम करून घेण्याची जबाबदारी आहे ते अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत आहे.
हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईची मंजूर निविदा 70 लाख रुपयाचे आहे.
त्यापैकी 80 टक्के काम झाल्याचा दावा पुणे मनपाचे नाला अधिकारी पुरम यांनी केलेला आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र ससाणे वस्ती हिंगणे मळा हडपसर गाव मुंढवा माळवाडी सातव नगर काळे बोराटे नगर या ठिकाणी मात्र दोन्ही ओढ्यामध्ये गाळ तसाच आहे. तसेच मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी गटार वाहिनी टाकण्यात आलेली आहे. ठिकाणी त्याला चेंबर देखील बसवण्यात आलेले आहेत त्या चेंबर मधून काळ काढल्यानंतर तो गाळ उचलण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. परंतु पंधरा दिवस होऊन सुद्धा तो गाळ तसाच रस्त्यावर आहे. गेल्या आठ दिवसापासून पावसाने जोर धरला असून तो गाळ पुन्हा त्या चेंबर मध्ये जाऊन पावसाचे पाणी रस्त्यावर जमा झाले. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढताना मोठ्या जिकरीचे झाले आहे.
यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग अजूनही नाल्यामध्ये असल्याचे चित्र आहे. अशा पद्धतीने काम झाले असेल तर अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर हिरालाल अग्रवाल म्हणाले की आम्हाला सर्वसामान्य नागरिकाला याचा मोठा प्रमाणात त्रास होत असून आंदोलन केल्याशिवाय आम्हाला कोणताही पर्याय दिसत नाही.
सातव नगर येथील नागरिक अर्जुन सातव म्हणाले की प्रत्येक कामाचा अहवाल तसेच काम करण्यापूर्वी चे फोटो आणि काम झाल्यानंतर चे फोटो याची संपूर्ण चौकशी करून जे यामध्ये जोशी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंदवावा. नागरिकांचे जीव एवढे स्वस्त नाहीत. अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष वेळीच द्यायला हवे.
संपूर्ण पुणे शहराच्या 15 क्षेत्रे कारल्या अंतर्गत येणाऱ्या नालेसफाईच्या कामात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना समाविष्ट 32 गावातील कामांची भयानया अवस्था आहे.
तेथे अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही आल्यामध्ये पोकलेन उतरून त्याचे व्हिडिओ काढून जीपीएस ट्रॅक असलेले फोटो काढून काम झाले असे दाखवले जात आहे.