भाजीपाला मार्केट यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून हे पद रिक्त

भाजीपाला मार्केट यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून हे पद रिक्त

हडपसर,
हडपसर येथील पुणे महानगरपालिके ची पंडित जवाहरलाल भाजीपाला मार्केट यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून मुकादम हे पद रिक्त आहे. त्यामुळे दैनंदिन पद्धतीने चालणारे काम याचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. महापालिकेतर्फे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला वेळ नाही. कारण गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात हडपसरमध्ये पावसाने थैमान घातलेला आहे

पत्रे बदलले परंतु बदललेल्या पत्रातून पाणी खाली आल्यानंतर ते पाणी बाहेर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सक्षम यंत्रणा या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर ते पाणी त्याच ठिकाणी साचून राहते. व या साचलेल्या पाण्यातून ग्राहकांना भाजी खरेदी करताना मोठी गैरसोय होत आहे. अर्धवट पद्धतीने केलेल्या कामामुळे ग्राहकांना तर त्रास होतच आहे परंतु भाजी मार्केटमध्ये देखील व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. ठिकठिकाणी पाण्याची तळी चाचत आहे पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे कोणत्याही पद्धतीने साफसफाई झालेली नाही अशी तक्रार स्थानिक नागरिक हिरालाल अग्रवाल यांनी केलेली आहे.

त्याचप्रमाणे साचलेल्या पाण्यातून ग्राहकांना पायवाट काढावी लागते एका हातात भाजीची पिशवी एका हातात छत्री अशा पद्धतीने तारेवरची कसरत करून नागरिकांना या ठिकाणी भाजी खरेदी करावयाला लागत आहे. त्याचप्रमाणे हडपसर भाजी मार्केटमध्ये जे दुचाकी साठी वाहन तळलेले आहे त्या ठिकाणी तर आनंदी आनंद आहे, कारण वाहनताळाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पत्रावरून येणारे पाणी साचले जाते आणि या साचलेल्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी कुठेही वाट नाही त्यामुळे ते पाणी गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून त्याच ठिकाणीच असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे,

तसेच त्या पाण्यात छोटे छोटे कीटक देखील जन्माला आलेल्या. अशा या दुर्गंधीयुक्त आणि आरोग्याच घातक असलेल्या पाण्यातून दुचाकी स्वरांना प्रवास करावा लागत आहे आपली गाडी त्या ठिकाणी पार करावी लागत आहे. या वाहन तळामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन करणारे व्यक्ती दारूडे बेवडे यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्याच ठिकाणी मद्यप्राशन करून लघुशंका देखील त्याच ठिकाणी करतात त्याचे व्हिडिओ व फोटो देखील आमच्या स्थानिक पत्रकारांनी काढलेले आहे. अशा या वाहन तळामध्ये महिलांना देखील येण्यासाठी भीती वाटत आहे.

सुरक्षारक्षकांना विचारल्यानंतर सुरक्षारक्षकाने उत्तर दिले या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत काही लाईट चालू आहेत तर काही लाईट बंद आहेत आणि या ठिकाणी सुरक्षा करताना त्याला देखील जीवावर उदार होऊन सुरक्षा करावी लागते. कारण दारूचे व्यसन करणारे व्यक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला त्याच्या जीवाची भीती वाटत आहे.

शेजारी असलेल्या स्वच्छतागृहामध्ये असंख्य प्रकारच्या समस्या आहेत. पुरुषांच्या स्वच्छता ग्रहांमध्ये पाण्याची सोय नाही प्रकाश व्यवस्था नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. या ठिकाणी रोगास आमंत्रण देणारे वातावरण निर्माण झालेले आहे. पुणे महानगरपालिका दरवर्षी स्वच्छ परीक्षण करत असते या परीक्षणामध्ये हडपसर भाजी मंडईतले स्वच्छतागृहाचे परीक्षण होत नाही का आणि होत असेल तर त्यावर उपाययोजना का केले नाही असे देखील संवाद या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याच्यापेक्षा भयानक अवस्था तर स्त्रियांच्या स्वच्छता ग्रहांची आहे.

स्त्रियांच्या स्वच्छता ग्रहांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी सुटलेली आहे तिथे कुठल्याही प्रकारच्या सोयी सवलती दिल्या जात नाही. पुणे महानगरपालिकेतर्फे येथे सर्व भाजीविक्रेत्यांकडून दर महिन्याला भाडे घेतले जाते. परंतु स्वच्छतागृहामध्ये जाण्यासाठी सुद्धा पाच रुपये द्यावे लागतात अशी तक्रार येथील महिला ग्राहकांनी केलेली आहे. तसेच ज्या महिला या ठिकाणी दिवसभर भाजी विक्री करतात त्या महिलांकडून सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदार पाच रुपये घेतल्याशिवाय त्यांना आज सोडत नाही.

पुणे महानगरपालिका भाडं कशाचं घेत असा संवाद देखील महिला भाजी विक्रेत्यांनी विचारलेला आहे.
मासिक पाळीच्या काळात पॅड बदलणे गरजेचे असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हायजिनिकता समीर जंतुकीकरण केले जात नाही असे या ठिकाणी पहावयास मिळत आहे. एकीकडे महिलांसाठी पुणे महानगरपालिका अनेक विविध योजना आणत आहे ठिकठिकाणी पैसे खर्च करत आहे. परंतु याच्या अगदी उलट हडपसर भाजी मंडई मधील स्वच्छतागृहाची विशेषता महिला स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय बिकट असून येथील महिला भाजी विक्रेत्यांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

 

भाजी मंडई मधील अधिकारी रूपाली जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!