पुणे शहरात अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक मोहीम!

पुणे शहरात अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक मोहीम!

पुणे शहरात अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक मोहीम!
### विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त पथकांकडून रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कारवाई

**पुणे :** शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) शहराच्या विविध भागांत धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सकाळपासून अतिक्रमण, बांधकाम, आकाशचिन्ह, आरोग्य आणि विद्युत विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत अनधिकृत पथारी व्यावसायिक, हातगाड्या, व्यावसायिक टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, जाहिरात फलक तसेच पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**कारवाईची प्रमुख ठिकाणे :**

– **सिंहगड रोड :** सकाळी ८ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली. वीर बाजी पासलकर चौक आणि गंगा भाग्योदय परिसरातही कारवाई करण्यात आली.
– **नगर रोड-वाघोली :** बकोरी रोड परिसरात दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त पथकांकडून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही.
– **येरवडा-वडगाव शेरी :** वाघोली-बकोरी फाटा परिसरात अतिक्रमण व बांधकाम विभागामार्फत कारवाई.
– **नगर रोड :** आठवडे बाजारातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई.
– **बालेवाडी :** अनधिकृत व्यावसायिक टेम्पो जप्त.
– **वारजे :** आकाशचिन्ह विभागाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनर हटविले.
– **कात्रज ते नवले ब्रिज :** राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडची पाहणी करून अस्वच्छता करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पदपथावर साहित्य ठेवणाऱ्या मार्बल व्यावसायिकांवरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
– **औंध-बाणेर :** पॅनकार्ड क्लब रोड परिसरातील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने राबविलेल्या या मोहिमेमुळे शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. मात्र, ही कारवाई केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता नियमितपणे सुरू राहणार का, तसेच हटविलेली अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!