साडेसतरानळीत २७,८०० चौरस फुटांवरील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

साडेसतरानळीत २७,८०० चौरस फुटांवरील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

हडपसर,

साडेसतरानळी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २७,८०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान परवानगी न घेता उभारण्यात आलेली पत्राशेड तसेच इतर अनधिकृत बांधकामे यंत्रांच्या साहाय्याने हटविण्यात आली. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या या बांधकामांवर महापालिकेने कठोर भूमिका घेत कारवाई केली.

सदर मोहीम शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर व अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. उपअभियंता संदीप शिंदे, कनिष्ठ अभियंता रमीज फरास तसेच आरेखक जयश्री जोशी व रोशन जाधव यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. कारवाईसाठी जेसीबी, जॉ कटर तसेच इतर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली.

 

नागरिकांनी अनधिकृत पत्राशेड उभारणे टाळावे. अशा प्रकारचे बांधकाम निदर्शनास आल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेला माहिती द्यावी. अनधिकृत पत्राशेड उभारणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

— संदीप शिंदे
उपअभियंता, बांधकाम विभाग
पुणे महानगरपालिका

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!