अवैध गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश

अवैध गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश

काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ९ लाख २७ हजार 377 रुपयांचा मुद्देमाल जप्त
हडपसर : काळेपडळ पोलिसांनी अवैध गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करत एकूण ९ लाख २७ हजार 377 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गांजासह चारचाकी वाहन व मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काळेपडळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी २७ सप्टेंबर रोजी हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, एसआरपीएफच्या मोकळ्या मैदानात एक इसम संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. त्याच्या हातातील पांढऱ्या रंगाच्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश प्रल्हाद अडसूळ (वय ४०, रा. अखिल एकता कॉलनी, रेल्वे गेटजवळ, काळेपडळ, हडपसर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ४४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पुढील तपासात गांजाचा पुरवठा करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून विजय राजू हुरळीकर (२९), बबन बाबुराव दांडगे (39), अशोक ऊर्फ अक्षय सतीश जाधव (२८), साहिल सुभाष ठोंबे (२७) आणि विकास संदीप बोदडे (२०) यांना अटक केली. या आरोपींकडून8 लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यात चारचाकी वाहन व मोबाईल फोनचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून, कोरेगाव, यवत, यवतवाडी, नगर तालुका आणि फिंगार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एनडीपीएस कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त परिमंडळ ६, पुणे शहर अतुलकुमार नवगिरे, सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निबांळकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलिस निरीक्षक (गुन्हे), सपोनि अमित शेटे, सपोनि रत्नदीप गायकवाड तसेच पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!