चंदननगर हवेली क्रमांक ७ मध्ये ‘बोगस दस्त’ नको!

चंदननगर हवेली क्रमांक ७ मध्ये ‘बोगस दस्त’ नको!

दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराविरोधात वकिलांचे आंदोलन

पुणे : चंदननगर येथील हवेली क्रमांक ७ दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराच्या विरोधात वकिलांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

दस्त नोंदणीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत बोगस दस्त नोंदणीला आळा घालावा, नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्या वकिलांनी केल्या.

दस्त नोंदणी प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत वकिलांनी संबंधित प्रशासनाकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. नागरिकांच्या मालमत्ता व्यवहाराशी संबंधित दस्तांची नोंदणी होत असल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता, नियमांचे काटेकोर पालन आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळणे आवश्यक असल्याचे वकिलांनी सांगितले.

दरम्यान, बोगस दस्त नोंदणीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच कार्यालयातील कामकाजाची योग्य पद्धतीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

वकिलांच्या प्रमुख मागण्या

– बोगस दस्त नोंदणीला आळा घालावा.

– दस्त नोंदणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी.

– नागरिकांना अनावश्यक त्रास देणे थांबवावे.

– कार्यालयीन कामकाजाची चौकशी करावी.

– गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!