हॉकी स्टिक, रॉड आणि कोयत्याने सपासप वार; मुख्य आरोपीला अटक

हॉकी स्टिक, रॉड आणि कोयत्याने सपासप वार; मुख्य आरोपीला अटक

केडगाव (दौंड) :

केडगावातील लालचंदनगर परिसर गुरुवारी रात्री हिंसाचाराने हादरला. जुन्या वादाची ठिणगी पेटल्याने तिघांनी मिळून एका २० वर्षीय तरुणावर कोयता, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून यवत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुद्ध उर्फ विशाल नितीन अवधुते (रा. पिसेवस्ती, केडगाव) हे ११ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास लालचंदनगर सोसायटीसमोरील ताज पान शॉप येथे थांबले होते. त्याचवेळी अजय अनिल भोसले, सुजल अनिल भोसले आणि अर्जुन आसवरे हे तेथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अवधुते यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

क्षणात वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले. आरोपींनी कोयता, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने अवधुते यांच्यावर सपासप वार करत बेदम मारहाण केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवधुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी अजय भोसले याला अटक केली. त्यास दौंड न्यायालयात हजर केले असता १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, गुन्ह्याचा सखोल तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!