हडपसर-मांजरीत अतिक्रमणांवर महापालिकेचा धडक कारवाईचा बडगा; ५४ हजार ५६० चौ. फुटांचे अतिक्रमण हटविले

हडपसर-मांजरीत अतिक्रमणांवर महापालिकेचा धडक कारवाईचा बडगा; ५४ हजार ५६० चौ. फुटांचे अतिक्रमण हटविले

हडपसर-मांजरीत अतिक्रमणांवर महापालिकेचा धडक कारवाईचा बडगा; ५४ हजार ५६० चौ. फुटांचे अतिक्रमण हटविले

हडपसर : हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, मंत्री मार्केट परिसर, साने गुरुजी हॉस्पिटल, साधना शाळा, तुपे नाट्यगृह आणि भाजी मंडई परिसरातील अनधिकृत रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे तसेच कच्ची शेड हटविण्यात आली.

या कारवाईत तब्बल ५४ हजार ५६० चौरस फूट क्षेत्रावरील कच्चे व पक्के अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये २८ काउंटर, ११५ शेड आणि ५३ झोपड्यांचा समावेश आहे.

ही कारवाई परिमंडळ क्रमांक ४ च्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलीस कर्मचारी, बिगारी सेवक, अतिक्रमण निरीक्षक व सहायक अतिक्रमण निरीक्षक यांच्यासह ओपन ट्रक आणि पिंजरा वाहनांचा वापर करण्यात आला.

अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम, सहायक निरीक्षक किरण शिंदे, सुजित तोगरे, प्रशांत कोळेकर, विनोद दुधे, अमोल धुळे, दीपक कुमदाळे आणि प्रतीक सानप यांच्या पथकाने ही मोहीम राबविली.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!