हडपसरमध्ये महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई; २३ हजार चौरस फुटांचे शेड जमीनदोस्त

हडपसरमध्ये महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई; २३ हजार चौरस फुटांचे शेड जमीनदोस्त

हडपसरमध्ये महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई; २३ हजार चौरस फुटांचे शेड जमीनदोस्त

गावठाण, सोलापूर रोड, भाजी मंडई परिसर आणि तुकाई टेकडी येथे कारवाई; ५ ट्रक साहित्य जप्त

हडपसर, दि. १८ नोव्हेंबर : पुणे महानगरपालिकेच्या हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) हडपसर गावठाण, सोलापूर रोड, भाजी मंडई परिसर आणि तुकाई टेकडी येथे अनधिकृत अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील कच्चे-पक्के शेड हटविण्यात आले असून, अंदाजे पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालय व परिमंडळ क्रमांक ४ येथील अतिक्रमण विभागाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला होता. दोन जेसीबी, एक गॅस कटर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलीस कर्मचारी, बिगारी सेवक, अतिक्रमण निरीक्षक व सहायक अतिक्रमण निरीक्षक यांच्यासह ओपन ट्रक आणि पिंजरा वाहनांचा वापर करण्यात आला.

अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक किरण शिंदे, प्रशांत कोळेकर, अमोल धुळे, सुजित तोगरे, दीपक कुमदाळे, रवी आडे, प्रतीक सानप, उपअभियंता अभय शिंदे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य वानखेडे आणि मयूर इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईत साहित्य जप्त

या कारवाईदरम्यान ६ काऊंटर, २ हातगाड्या, ३६ शेड, १ सिलेंडर, १ लोखंडी स्टँड आणि इतर ६ साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सुमारे २३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील कच्चे-पक्के शेड हटविण्यात आले.

अनधिकृत अतिक्रमणांविरोधात यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक साईनाथ निकम यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!