दिल्लीतील ‘आप’ पक्षाला मोठा झटका, १५ नगरसेवकांचा राजीनामा

दिल्लीतील ‘आप’ पक्षाला मोठा झटका, १५ नगरसेवकांचा राजीनामा

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षातील १५ नगरसेवकांनी एकत्रितपणे राजीनामा दिला असून, त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षातील १५ नगरसेवकांनी एकत्रितपणे राजीनामा दिला असून, त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या बंडखोर नगरसेवकांनी ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे.

हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली या नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली असून, मुकेश गोयल यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एमसीडीमध्ये तिसरी आघाडी तयार करत, त्यांनी सत्ताधारी ‘आप’ आणि विरोधी पक्ष भाजप दोघांनाही आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.

नवीन पक्ष स्थापन करणाऱ्या नगरसेवकांनी ‘आप’ पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून, स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर पक्षात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ हा लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारावर भर देईल, असे या बंडखोर नगरसेवकांनी सांगितले. या घडामोडींमुळे दिल्लीत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीवर या नव्या पक्षाच्या प्रवेशाचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावं

हेमचंद गोयल

दिनेश भारद्वाज

रुनाक्षी शर्मा

हिमानी जैन

उषा शर्मा

साहिब कुमार

राखी यादव

अशोक पांडे

मनीषा

राजेश कुमार लाडी

सुमन अनिल राणा

देवेंद्र कुमार

दिनेश भारद्वाज

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!