श्रीराम चौक येथे चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी

श्रीराम चौक येथे चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी

हडपसर:

हांडेवाडी रस्त्यावरील सातव नगर परिसरातील श्रीराम चौक येथे चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलेले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे.

हडपसर परिसरात गेल्या आठवड्याभरात पावसाची रिपरीप चालू होती पावसाच्या पाण्यामुळे या परिसरातील अनेक ठिकाणी चेंबर तुंबले आहे.  गेल्या ८ दिवसांपासून हांडेवाडी रस्त्यावरील सातव नगर येथील चेंबर तुंबल्याने सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय हे पाणी रस्त्याच्या कडेला व सातव नगर परिसरात जमा होत आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय रस्त्यावर  वाहनांची कायम मोठी  वर्दळ असते. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन या चेंबरची दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

 

सातव नगरहून हडपसर भागात अनेक वेळा जावे लागते या चेंबर तुंबल्याने त्यातून वाहणाऱ्या  घाणेरड्या व दूषित , मैलायुक्त सांडपाणी येताना जाताना अंगावर उडते. त्यामुळे वादाचे प्रसंग ओढवत आहे. पालिकेने  त्वरीत दुरुस्ती करावी. ऑनलाइन तक्रार करून देखील हडपसर क्षेत्रीय कार्यालय समस्ये कडे दुलक्ष्य करीत आहे.

अर्जुन सातव – सातव नगर

 

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!