
भुयारी मार्गामध्ये रस्त्याची चाळण
हडपसर:
ससाणे नगर वरून हांडेवाडी कडे जाताना भुयारी मार्गातून जावे लागते. रवी पार्क समोर असलेल्या भुयारी मार्गामध्ये सध्या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली पाहायला मिळते.
सिमेंट काँक्रीटच्या या रोडला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत.तसेच आतील लोखंड देखील बाहेर आलेले आहे.
म्हणजे ठेकेदाराने कोणत्या दर्जाचे काम केले आहे असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या रस्त्याला लागलीच कडे जाऊन त्याच्यावर खड्डे कसे काय पडू शकतात असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तसेच केलेल्या कामाचा दर्जा त्याला वापरण्यात येणारे मटेरियल याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.?
ठेकेदाराने काम केल्यानंतर कॉलिटी कंट्रोल साठी देखरेख अधिकारी नेमून दिलेल्या असतात त्यांनी व्हिजिट करणे क्रमप्राप्त असते .तसेच झालेल्या कामाचा दर्जा , वापरण्यात आलेले साहित्य त्याचा दर्जा याचे देखील परीक्षण करणे आवश्यक असते. त्याचा अहवाल करून तो अहवाल बिलाबरोबर सादर करणे अपेक्षित असते.
या सर्व प्रोसेस मधून गेल्यानंतर एखादा रस्ता खराब कसा होऊ शकतो त्याला खड्डे कसे पडू शकतात खड्डे पडल्यानंतर त्याची जबाबदारी नक्की कोणाची कॉलिटी कंट्रोलचा अहवाल जर ओके असेल वापरण्यात आलेले मटेरियल जर टेंडर प्रमाणे केले असेल तर खड्डे कस काय पडतात असा संवाद आता येथील जागरूक नागरिकांना पडलेला आहे.
म्हणजेच या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे आता सिद्ध झालेले आहे.
त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक व्याधी होत आहे दुचाकी स्वार खड्ड्यामध्ये गाडी आपटल्याने रस्त्यावर पडत असून मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
तसेच या भुयारी मार्गात पावसाळातील पाणी वाहून जाण्यासाठी चेंबर केलेले आहेत त्यावर लोखंडी जाळ्या बसवलेले आहे त्या लोखंडी जाळ्यात देखील नादुरुस्त झालेले आहेत त्याची दुरुस्ती व्हावी अशी देखील मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे.
स्थानिक नागरिक राजेश पाटील,मच्छिंद्र वाडकर,संतोष सातव, तेजस ससाणे, रणजीत बोराटे, स्वप्नील काळे , मिना थोरात, बिना कट्टमनी यांनी तातडीने नियमानुसार खड्डे बुजवून रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.