धोकादायक वृक्ष, फांद्यांकडे हडपसर क्षेत्रीय कार्यालय ,वृक्ष प्राधिकरण यांचे दुर्लक्ष…

धोकादायक वृक्ष, फांद्यांकडे हडपसर क्षेत्रीय कार्यालय ,वृक्ष प्राधिकरण यांचे दुर्लक्ष…

 

हडपसर,

हडपसर भागात वृक्षांची संख्या मोठी असली तरी त्यातील अनेक धोकादायक आहे. वाळलेल्या फांद्या अचानक रस्त्यावर पडून त्यात नागरिक जखमी होत आहे. मागील वर्षी काही नागरिकांचा जीवही गेला आहे. तरीही महापालिकेच्या उद्यान विभागाला आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांना जाग आलेली नाही. फांद्यांची छाटणी करावी वाळलेली झाडे काढून टाकावेत असे अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे आले आहेत

पण कर्मचारी अधिकार टेंडर संपले आहे तुम्ही खाजगी ठेकेदाराला पैसे देऊन काम करून घ्या, असे सांगत आहे. त्यामुळे धोकादायक फांद्या वाकलेल्या झाडांमुळे भयानक स्थिती हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निर्माण झालेली आहे.

मागील वर्षी सातव नगर भागात

झाडाची फांदी कोसळून नरेश पाटील (वय 59) यांचा मृत्यू झाला होता . तसेच पुण्यामध्ये देखील सोमवारी सायंकाळी झाडाची फांदी कोसळून राहुल श्रीकांत जोशी (वय 49) यांचा मृत्यू झाला शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराजवळ चहा पित थांबलेल्या अभिषेक गोंड या इसमाच्या डोक्यात वाढलेली फांदी पडून त्याचे मृत्यू झाला होता तर टिळक रस्त्यावर झाड पडून त्यावेळी माळसिंग पवार यांचे मृत्यू झाला होता. अशा दुर्घटना घडल्या की महापालिका प्रशासन काही दिवस गांभीर्याने काम करते. मात्र त्यानंतर पुन्हा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. जानेवारी ते 26 मे पर्यंत शहरात 359 गाडीवरून मळून पडली आहे तर 2025 मध्ये १६८५ झाडे पडली होती.

 

*अर्जांची स्थिती*

धोकादायक वृक्ष तोडणे किंवा त्याच्या फांद्या तोडण्यासाठी नागरिकांकडून सोसायटीकडून क्षेत्रीय कार्याकडे अर्ज केला जातो.

तेथील वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्तांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असतात.

हार्टिकल्चर र मिस्त्री वरही आलेल्या तक्रारींचे शहानिशा करून त्यावर योग्य कारवाई करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असते.

झाडाच्या फांद्या तोडणे, छाटणी याच्या ऑनलाइन तक्रारी आल्यानंतर त्या परस्पर बंद करून टाकले जातात.

क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या अर्जांवर अनेकदा  निर्णय घेतली जात नाही.

नागरिक अनेकदा खेटे मारतात परंतु त्यांना दाद दिली जात नाही.

नागरिकांना परवाने फांदी छाटल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पूर्ण करण्याचे प्रकार घडतात.

काही जणांचे अर्ज एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहे.

 

 

खाजगी ठेकेदारांसोबत कामाची सेटिंग ?

नागरिकांनी तक्रार केल्यानंतर क्षेत्री कार्यालयाने त्याची तपासणी करून फांद्यांची मोफत छाटणी वाढलेल्या फांद्या तोडणे धोकादायक झाडे कायदेशीर प्रक्रिया करून तोडणे अपेक्षित आहे. पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हे काम करण्यासाठी निधी संपला आहे, निविदे ची  मुदत संपली आहे, नवीन निविदा अजून काढलेली नाही, निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दिला आहे, पण थोडा वेळ लागेल अशी कारणे देऊन, तुम्ही खाजगी ठेकेदाराला पैसे देऊन तुम्ही तुमचे काम करून घ्या, असा अजब सल्ला दिला जातो. खाजगी ठेकेदार काम करण्यासाठी दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतो. त्यामुळे जे काम फुकट होऊ शकते त्यासाठी नागरिकांना मोठा भर दंड सहन करावा लागतो. खाजगी ठेकेदारांसोबत काही कर्मचाऱ्यांचे लागेबंदी असल्याची चर्चा प्रशासनात आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )
error: Content is protected !!