पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
Hadapsar : हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला (दहशतवाद विरोधी पथक) मोठे यश आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपीने अवघ्या 400 रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये डिजिटल घड्याळ, चार पाईप ,सेलो टेप, दोन वायर काळे आणि लाल, स्फोटके असा बॉम्ब बनवला होता. आरोपीच्या घरी 2 किलो गांजा मिळून आला आहे, त्याचा तपासही केला जात आहे.
फक्त 400 रुपये खर्चून आरोपीने हा बॉम्ब बनवला
आरोपी नागपूर मधून पुढे हावडा मार्गे नेपाळ जाणार होता. त्या ठिकाणी आरोपीची बहिण नेपाळला राहते. तिकडे जाणार होता. भारतात इकडे उन्हाळा आहे म्हणून बहिणीला तिकडे येतो म्हटला होता.आरोपीला गुप्त रोग होता. त्याच्या उपचाराला हॉस्पिटलने 7 लाख रुपये खर्च सांगितला होता.उपचार करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे हॉस्पिटलला धमाकावून तो पैसे घेऊन उपचार करणार होता. त्याच हॉस्पिटलमधून खंडणी वसूल करुन त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा त्याचा प्लॅन होता. आरोपीने फक्त 400 रुपये खर्चून हा बॉम्ब बनवला होता. आरोपीला शोधायला यंत्रणेचा 4 लाखपेक्षा अधिक खर्च झाला आहे. राज्यभर या आरोपीचा शोध तब्बल 1000 अधिकारी आणि कर्मचारी घेत होते.
नेमके प्रकरण काय?
बुधवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद वस्तू दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले होते.
ऑनलाइन पद्धतीने टायमरचे घड्याळ मागवलं होतं
बॉम्ब बनवताना आरोपीचा सेलो टेप संपला, तो त्याने शेजारच्या दुकानातून विकत घेतला, त्याचं पेमेंट ऑनलाईन केल, त्यावरून त्याला शोधणे सोप झाले. ऑनलाइन पद्धतीने टायमरचे घड्याळ मागवलं होतं, त्याचा बॉक्स देखील त्याच्या घरी सापडला आहे.
घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आढावा घेतला. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब वेळेतच निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस आणि आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) सारख्या केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले होते. संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशीही करण्यात आली होती. अखेर तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला आणि त्याचे लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झाले. आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली असून, सध्या त्याला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. तर आरोपीने नागपूर एटीएसला आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.
