हजारो नागरिकांना 2 किलोमीटर ची करावी लागते पायपीट
रामटेकडी ,ससाणेनगर , काळे बोराटेनगर ,येथील नागरिकांना पादचारी पुल न करता रेल्वे प्रशासनाने सर्व मार्ग बंद केले. त्यामुळे हजारो नागरिकांना 2 किलोमीटर ची पायपीट करत वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
धनंजय बोराटे म्हणाले की भारतीय रेल्वे विभागाने काल पासुन काळेबोराटेनगरचे रेल्वे फाकट पूर्ण पणे बंद केल्याने अंदाजे पन्नास हजार लोकांची, शाळकरी मुलांची येण्या- जाण्याची गैरसोय होत आहे या बाबत सर्वं नागरिक, व्यवसाय करणारे, या विभागातील समाजसेवक,मा.नगरसेवक,आमदार ,खासदार यांनी तातडीने लक्ष घालून याठिकाणी लवकरात लवकर पादचारी भुयारी मार्ग व्हावा. यासाठी योग्य प्रयत्न करावा.
शांताराम वाडकर म्हणाले की महापालिकेला सर्व नागरीकांनी सहया केलेले निवेदन द्यायला हवे त्याकरता एक मोहीम राबविण्यात यावी.
महंमद वाडी नागरिक कृती समिती चे अर्जुन सातव म्हणाले की भारतीय रेल्वे प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी सर्व वृतपात्रात मध्ये निवेदन देवुन पुणे स्टेशन ते नीरा मार्गावरील अंदाजे दोनशे मेन अॅापरेटेड लेव्हल क्रॅासिंग बंद करण्यात येणार आहेत . अशा लेव्हल क्रॅासिंगवर स्थानिक प्रशासन म्हणजे जिल्हा परिषद, महानगर पालीका . ग्रामपंचायती यांनी उड्डाण पुल , भुयारी मार्ग अथवा इलेव्हेटेड पादचारी मार्ग तयार करण्याचे ठरविल्यास पन्नास टक्के खर्च देण्याची हमी दिलेली आहे.
आमच्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधी अत्यंत कार्यक्षम असल्याने , त्यांनी या प्रश्नाकडे गांभिर्याने घेवुन निधी तरतुद केलीच नाही.