सातबारा वरील चूक दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
पुरंदर ,
हवेली , तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी सातबारा वरील चूक दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत याची चौकशी करावी. अशी मागणी ग्राहक हक्क संरक्षण समिती पुणे जिल्हा.अध्यक्ष महेश राऊत यांनी केली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सर्वसाधारण संगणीकृत झाले आहेत. त्या संगणिकृत सातबारा मध्ये अनेक चुका झालेले आहेत. त्या चूक दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी व मंडल अधिकारी व आपल्या कार्यालयाकडे मारत आहेत परंतु तलाठी व मंडळ अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्ती सातबारावर चूक दुरुस्ती करत नाहीत. पैसे न दिल्यास वारंवार हेलपाटे मारायला लावत आहे.
जुने हस्तलिखित सातबारा बंद झाले आहे. काही शेतकरय्नी तीन तीन महिने अर्ज दिले आहेत. सातबारा वरील चूक दुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती कर्ज सोसायटी कर्ज यामध्ये फार त्रास होत आहे. तरी आपण यावर स्वतः दखल घालून यावर कारवाई करावी. असे पत्र तहसीलदार यांना दिले आहे . तसेच दहा दिवसात ठोस कारवाई करावी. अन्यथा संघटनेमार्फत 26 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय पुरंदर याच्यापुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे . याबाबत ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश मारुती राऊत यांनी आज पत्र दिले आहे यामध्ये तातडीने चौकशी करावी, चौकशीत दोषी कर्मचारी, कोतवाल , तलाठी , मंडल अधिकारी तातडीने निलंबन करावे .अशी मागणी केली आहे.