सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वसामाजिक – पक्षीय निषेध आंदोलन
हडपसर : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात एवढ्या निर्गुणपणे हत्या करत माणुसकीला काळीमा फासणारी पहिलीच घटना घडली आहे. राजकीय स्वार्थापोटी आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही ठराविक राजकीय नेते जातीय तेढ निर्माण करत आहेत. बीडच्या हत्येमागे सत्ता, पैसा आणि दहशत असे समीकरण असल्याने बीडचा बिहार होत आहे . पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे खूप मोठे षडयंत्र सुरू असल्याने सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर वतीने गांधी चौक याठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी विजय देशमुख, अविनाश काळे, समीर तुपे, महेश टेळे, अनिल बोटे,संदीप लहाने,प्रशांत कुंजीर, प्रविण हिलगे, नितिन गावडे, सुभाष जंगले,गहिनीनाथ पवार, शुक्राज काळे, दिलीप काळे, अशोक जामगे, राजेंद्र चौधरी, स्वप्नील कुऱ्हाडे, सुधीर मते,सुनिल काळे, राहुल काळे, संदीप काळे, रमजान शेख, अतुल येवले,अतुल पवळे, बाबू काळे, राजकन्या जावळे आदी सर्वसामाजिक व पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी दोषी असणाऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी , हत्तीचा मास्टरमाइंड असणारा वाल्मीक कराड याचा शोध घेऊन मोका लावावा, मागील एक वर्षांमधील जातीय तणाव आणि तेढ निर्माण करणाऱ्या सर्व गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी.
खून ,दरोडे, खंडणी,अत्याचार, बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपीं यांच्यावर मोकाका कायदा लावावा, नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहात आवाज उठविणाऱ्या संबंधित सर्व आमदारांना संरक्षण द्यावे अशा मागण्यांसह मराठा – बहुजन समाजाच्या वतीने रस्त्यावर उभे राहत निषेध आंदोलन करण्यात आले.