शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणी पुरवठा होणार
मांजरी:
महापालिका हद्दीत असलेल्या शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असा सूचना महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यात यावा ,
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहूल शेवाळे यांनी निवेदन दिले होते .यावर आज महापालिका येथे आयुक्त ,पाणी पुरवठा विभाग आणि शेवाळेवाडी ग्रामस्थ बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप ,लष्कर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश शिंदे ,उपभियंता दत्तात्रय टकले,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे, शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे , विजय कोद्रे, विलास शेवाळे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे , मंगेश शेवाळे, सिद्धार्थ शेवाळे आदीजन उपस्थित होते. शेवाळेवाडी गावचा सर्वे करून घ्यावा, गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी तपासणी करून तसे इस्टिमेट तयार करावे. असा सूचनाही आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला यावेळी केल्या.पाणी पुरवठा विभागाचा सर्वे झाल्यानंतर त्याला लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल.
पुढील आठ दिवसात प्रस्ताव सादर करावा जेणे करून पुढील काही दिवसातच नागरिकांना बंद नळाने पाणी पुरवठा सुरु केला जाईल. असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
शेवाळेवाडी गावचा महापालिकेमध्ये समावेश होऊन चार वर्षे झाली
आहेत. तथापि, गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे विशेषता महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. गावची लोकसंख्या पंचवीस हजार असून दिवसेंदिवस ती वाढतच आहे.
नागरिकांना सध्या टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गावातील गल्लीबोळ अरूंद असल्यामुळे टँकरमधून होणारा पाणीपुरवठा धोकादायक ठरत आहे. महिलांना कसरत करीत
पाणी वाहून न्यावे लागत आहे. याशिवाय टँकरद्वारे पाणी चोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याबाबत महिलांच्या खूप तक्रारी येत आहेत. त्यासाठी पालिकेकडून बंद नळाद्वारे पाणीपुरवठा होणे अतिशय गरजेचे झाले आहे.असे यावेळी राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिवाळी अधिवेशना भेट घेतली होती. त्यावेळी गावाच्या पाणी समस्येबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. आज त्यासंदर्भात महापालिकेत आयुक्त, पाणी पुरवठा विभाग आणि आमच्यामध्ये बैठक झाली.त्यात
शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा होण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच गावाला बंद नळाने पाणी पुरवठा होईल, असा विश्वास आहे.
राहुल शेवाळे
सरचिटणीस- भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा.