राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
प्रथमेश गायकवाड
इंदापूर,
वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब. ता. इंदापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवकर होते. यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माने यांनी केले. तर सूत्रसंचालन माननीय काशीद यांनी केले.
माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी थोडक्यात मनोगते व्यक्त केली.
इयत्ता पाचवी मधील स्वराली हनुमंत जाधव, समीक्षा युवराज गोरे, इयत्ता सहावी मधील तेजस्विनी अनिल जाधव, इयत्ता आठवी मधील राधिका अनिल जाधव, रुचिता गणेश राऊत, अपेक्षा सचिन वनवे, यशवंती अजित खरात, प्रांजली श्रीरंग वाघमोडे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.
स्वराली हनुमंत जाधव, रुचिता गणेश राऊत, राधिका अनिल जाधव या विद्यार्थिनींनी “मी जिजाऊ बोलतेय” यावर एकपात्री नाट्य सादर केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे युवा संचालक प्रताप सिंह कदम, प्राचार्य सुरेश अर्जुन , पर्यवेक्षक आळंद, शिक्षक प्रतिनिधी पाटील .काशीद , सोलनकर , हजारे , राऊत , माने , धनवडे , पाटोळे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार धनवडे यांनी मानले.