Blog

योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा

महाकुंभमधील चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राजीनामा मागितला आहे. कुणाचा मृत्यू झाला नाही, अफवा सुरु आहे, असे तुम्ही आम्हाला सांगितले, एवढी मोठी घटना लपवता कशाला, मुख्यमंत्री खोटे बोलले, या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हस्तक्षेप करावा, असे शंकराचार्य म्हणाले.

काल घडलेल्या चेंगरा चेगरित ३० भाविक मृत्यू झाल्यामुळे अनेक जणांनी चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षेचे उपाय योजना करण्यात सरकार कमी पडत आहे का ? असा सवाल भाविक,संत यांच्या कडून विचारण्यात येत आहे

दिवसभरात उत्तर प्रदेश सरकार कडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात येत न्हवती .सायंकाळी उशिरा माहिती प्रसारित करण्यात आली.आदित्यनाथ योगी यांनी तातडीने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुढे येत आहे. त्या जागी सक्षम असलेल्या व्यक्तीची निवड करण्यात यावी.

प्रयागराज येथील महा कुंभमेळा महा शिवरात्री पर्यंत आहेत.याठिकाणी अनेक करोडो भाविक येण्याची शक्यता पाहता त्यांच्या सुरक्षेचे सर्व उपाय करण्यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी अशी मागणी शंकराचार्य यांनी केली आहे

Related Articles

Back to top button