या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
रोहित मेमाणे,
सुपा (जि. अहिल्यानगर) :
सूपा परिसरातील रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी , रांजणगाव रोड येथील ज्वारी हरभरा गहू भुईमूग ही पिके हरीण व रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे वन्यप्राणी कुरतडून मोठे नुकसान करत आहेत. वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
गतवर्षी पावसामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. त्यात आणखी समस्या वाढली असून, वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी रविंद्र बांदल व स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
काही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या वन क्षेत्राला लागून आहे त्यामध्ये कोणतेही पीक घेतले तरी ते पीक हरण इतर वन्य प्राणी खाऊन टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. यामध्ये लक्ष घालून काहीतरी उपाययोजना कराव्यात असे स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे.