मोबाईल चोरट्यानां ठोकल्या बेड्या…..
हडपसर : मोबाईल चोरत असताना विरोध केल्याने चालकाला चोरट्यांनी ३०० मीटर फरफटत नेत हाताला चावा घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी १००हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढत तिघांना बेड्या ठोकल्या.
मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (वय २१) आणि कृष्णा संजय वाणी (वय २०, दोघे रा. ताडीगुप्ता चौक, धायरकर वस्ती, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी डी. पी. रोडवरून भगीरथी नगर सोसायटीकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला तसेच दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. गाडीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीस हाताला चावून जखमी केले होते. पोलिसांनी गुन्’ाचे घटनास्थळाच्या ठिकाणचे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्या आधारे तपास पथकाने तिघांना पकडले. आरोपींनी गुन्’ाची कबुली दिली असून, चोरलेला मोबाईल व त्यासाठी वापरलेली दुचाकी असा ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, महेश कवळे, संदीप राठोड, सचिन जाधव, दीपक कांबळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.