फरारी आरोपी गजाआड करण्यात दौंड पोलीसांना यश
दौंड,
दोन वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी गजाआड करण्यात दौंड पोलीसांना यश आले आहे.आरोपीस कर्नाटक राज्यातुन केली अटक केली आहे.
मौजे पेडगाव ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत रामभाऊ सोनबा गोधडे यांचे मालकीचे जमीन गट नंबर २७३ मध्ये राहत असलेले दिलीप शंभु सांगळे यांचेकडे कोळसा काम करणारे लेबर हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा. कारले, गंगेचीवाडी ता. पेन जि. रायगड, लिला उर्फ रूपाली गणेश वाघमारे रा. भुनेश्वर ता. रोहा जि. रायगड यांनी त्यांचेसोबत काम करणारा लेबर नामे चंदर गणपत जाधव वय ६० वर्षे रा. वांद्रे ता. मुळशी जि.पुणे याचा कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्यारांने त्याचे उजव्या डोळ्या जवळ, गळयावर व डावे हाताचे खांदयावर गंभीर मारहाण करुन खून करून त्याचे प्रेत ऊसाचे पाचटा खाली लपवून ठेवुन पळुन गेले होते.
त्याबाबत त्यांचेविरुध्द दिलीप शंभु सांगळे यांनी दौंड पोलीस स्टेशन गु.र. नंबर १७७/२०२३ भा.द.वि.क ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचे आरोपी मार्च २०२३ गुन्हा केले पासुन फरार होते. गुन्हयामधील मुख्य आरोपी हरिशचंद्र उर्फ हरिभाऊ नवश्या वाघमारे रा. कारले, गंगेचीवाडी ता.पेन जि. रायगड याचा बदामी कनार्टक राज्यात शोध घेवुन त्यास अटक करण्यात आली होती
तसेच यातील फरारी महिला आरोपी नामे रूपाली उर्फ लिला गणेश वाघमारे वय ३५ वर्षे रा. भुनेश्वर ता. रोहा जि. रायगड ही अनंतपुर, राज्य आंध्रप्रदेश येथुन रेल्वेने दौंड मार्गे रायगड येथे जात असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच दौंड पोलीस पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ पाठवुन सदर महीला आरोपीस मुंबई बेंगलोर उदयान एक्सप्रेस मधुन ताब्यात घेवुन तिस सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस दौंड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पो. हवा. किरण पांढरे, पो. हवा विनोद चव्हाण, पो. हवा किरण ढुके, पो. कॉ संजय कोठावळे, पो. कॉ योगेश पाटील पो. कॉ चितारे म.पो.कॉ मोकळे यांनी मिळून केली आहे.