Deprecated: File Theme without header.php is deprecated since version 3.0.0 with no alternative available. Please include a header.php template in your theme. in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6114
पारनेर तालुक्यात अवैंधरित्या चालविल्या जातात लॅब - Navmaha पारनेर तालुक्यात अवैंधरित्या चालविल्या जातात लॅब - Navmaha

Blog

पारनेर तालुक्यात अवैंधरित्या चालविल्या जातात लॅब


सुपा अहिल्यानगर,

विना परवाना अवैंधरीत्या चालविल्या जाणारऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅब वर त्वरित गुन्हा दाखल करुन बंद कराव्यात जर आरोग्य अधिकारी यांनी यांची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि आठ दिवसांत कारवाई चा लिखीत स्वरुपात खुलासा केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैंधरित्या चालविल्या जाणारऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅब वर मनसे स्टाईल दनका दिला जाईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास पुर्ण पणे जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्या- नगर ,पारनेर तालुका आरोग्य अधिकारी जिम्मेदार राहिल असा इशारा मनसे माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी अहिल्या- नगर जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले आहे.

पारनेर तालुक्यात परवाना धारक लॅब किती आहेत व विना परवाना अवैंधरीत्या चालविल्या जाणारऱ्या लॅब किती आहेत तसेच पारनेर तालुक्यातील जनतेच्या जीवाशी टेस्ट च्या‌ नावाने खेळ मांडला जात आहे हे दुर्दैवी आहे पारनेर तालुक्यातील लॅब धारकांनी आपली स्वतःची ओळख, नावासह शिक्षण, तपशिल बोर्ड, तसेच विविध चाचण्या संदर्भात नियमावली फलक कोणत्याही लॅब मध्ये लावण्यात आले नाहीत

तसेच दिवसेंदिवस यात वाढ होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे परवाना धारक लॅब मध्ये विविध चाचण्या (टेस्ट) संदर्भात नियमावली फलक लावण्याचे बंधनकारक करण्यात यावे जे लॅब चालक नियमावली चे पालन करणार नाही त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. अशी मागणी केली आहे.

.

Related Articles

Check Also
Close

Deprecated: File Theme without footer.php is deprecated since version 3.0.0 with no alternative available. Please include a footer.php template in your theme. in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6114