एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
हडपसर :
हडपसर येथील ग्लायडीग सेंटर बाबत गेल्या दोन वर्षापासून 99 वर्षाच्या करारावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेली 15 दिवस नगरसेवक योगेश ससाणे हे नागरिकांसह रस्त्यावर उतरलेले आहेत .
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ला 1 रुपये नाममात्र भाड्यावर 99 वर्षाच्या कराराने PPP मॉडेल वर सदरची जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे .
सदरचा निर्णय हा मागल्या दाराने खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे .187 रुपये नाममात्र पैशामध्ये एकदा ग्लायडर विमाना मध्ये बसता येतं व ज्यांना वैमानिक व्हायचा आहे त्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांना 40 ते 50 हजार रुपये मध्ये वैमानिक होता येते .
परंतु PPPमॉडेल वरती हस्तांतरित झाल्यास सदरचा 187 रुपये दर बंद होऊन तो कितीही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो , त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुला -मुलींना ग्लायडर वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतील , म्हणून या निर्णयाविरोधामध्ये जवळपास 6000 पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या असून 25000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पोस्टकार्ड पत्र तयार करून पाठवली आहेत .
याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या विषयांमध्ये विरोध करणारे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी ठेवलेला आहे ,
सदरचे उपोषण हे रविवारी ग्राइंडिंग सेंटर मेन गेट पुणे सासवड रोड या ठिकाणी सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. तरी हडपसर पंचक्रोशीतील नागरिकांनी या ठिकाणी येऊन उपोषणाच्या ठिकाणी येऊन सही करून सदर गोष्टीचा निषेध नोंदवावा तसेच मानवी साखळी करून या निर्णयाविरोधात असलेला विरोध दर्शवावा असे आवाहन योगेश दत्तात्रय ससाणे यांनी केले आहे