Blog

अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत केडगाव मध्ये कडकडीत बंद

प्रथमेश गायकवाड, दौंड केडगाव

भिम क्रांती मित्र मंडळ व सर्व बहुजन समाज यांच्या वतीने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व लोकसभा मध्ये अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत केडगाव मध्ये कडकडीत बंद पाळून जाहीर निषेध करण्यात आला.

केडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. अमित शहा यांचा फोटो चे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भीम सैनिकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या . यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे दौंड तालुका महासचिव प्रथमेश गायकवाड बोलताना म्हणाले की, अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे त्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, आणि तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी करण्यात आली .तसेच परभणी येथ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युला जबाबदार असलेले पोलीस अधिकारी तसेच सह आरोपी यांच्यावर कडक कारवाई करावी . पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन करण्याचे आदेश कोणी दिले या बाबत सखोल चौकशी करावी. दोषींवर कड्क कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली . सागर खांडेकर,सोमनाथ सूर्यवंशी यांनी परभणी येथील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा. अशी मागणी केली .यावेळी भीम क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, व सर्व बहुजन समाज भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

Related Articles

Back to top button