Blog

अनेक दिवसापासून रस्त्यावरील पथदिवे बंद

दीपक वाडकर, फुरसुंगी,

तुकाईदर्शन रोड वर गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावरील पथदिवे बंद आहे . काही दिवसापूर्वी एक गाडी खांबावर धडकल्यामुळे खांब पूर्णपणे तुटून पडला. त्यानंतर येथील पथदिवे बंदच आहेत .

ह्या रोडवर रात्री उशिरा दारुडे चोर भुरट्यांचा वावर असल्यामुळे एकट्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावणे, चैन स्नॅचिंग चे प्रकार आधीच घडत असल्यामुळे आता अंधाराचा फायदा घेऊन रात्री नोकरीवरून येणाऱ्यांना लुबाडण्यात येते. त्यात महिला एकट्या असतात. अंधाराचा फायदा घेऊन एखादा मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे .नगरपरिषद झाल्यामुळे आता हे काम महानगरपालिका लक्ष देत नाही .त्यामुळे लवकरात लवकर येथे पथदिवे सुरु करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत

Related Articles

Back to top button