‘या’ इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलवर गुन्हा दाखल
हडपसर , शेवाळवाडी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना मारहाण होत आली होती . त्याची दाखल घेत शाळेची चौकशी शिक्षण अधिकारी करून हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शंतनू जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि या आंदोलनानंतर चौकशीअंती या शाळेला परवानगीच नसल्याची बाब समोर आल्याने या शाळेत ऍडमिशन घेऊ नये. असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. या शाळेचा यु-डायस नंबर आणि मान्यता क्रमांक त्याची पडताळणी करण्यात आली.त्यामध्ये दुसऱ्या शाळेचा नंबर वापरून ही शाळा येथे चालवली जात होती.
या ठिकाणी असणाऱ्या मुलांना मोठ्या प्रमाणावर मारहाण होत होती. या शाळेचे व्यवस्थापक सत्यम चव्हाण व मुख्यध्यापिका रोहिणी लाड यांनी जीआर क्रमांक एसएफएस १०१९/प्रक्र/१६०७/एसएमर दिनांक ०८/०३/२०१९ हा बनावट शासन निर्णय गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती हवेली, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांना सादर करुन, शासनाची दिशाभूल करुन, अनाधिकृत शाळा सुरु केली. त्यामुळे ननूद प्रकरणात या शाळेवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक संजय नाईकडे यांच्या पत्रानुसार गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, हवेली यांना आदेशीत केल्याने, गट शिक्षण अधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे यांनी सरकारतर्फे मॅरेथोन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे व्यवस्थापक सत्यम चव्हाण, वय ४० वर्षे व मुख्याध्यापिका रोहिणी लाड, वय ४० यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे बस वेळेवर का येत नाही म्हणून जाब विचारल्याने १८ दिवस मंगेश सोनवणे या विद्यार्थ्याला शाळेत घेतले नाही. स्कूल कर्मचारी चव्हाण हे पालकांना शिवीगाळ करून धमकले .
मुलांना गणवेश, पुस्तके दिली गेली नाहीत, पगार दिला गेला नाही यामुळे शिक्षक शाळा सोडून जात होते . त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे अतोनात नुकसान झाले , व्यवस्थापनाने शाळेत ठेवलेल्या बाऊंसर्सची विद्यार्थी आणि पालकांवर दहशत निर्माण झाली होती.असे आरोप करत पालकांनी सोलापूर महामार्गावरील मॅरेथॉन स्कूलसमोर निदर्शने करत आंदोलन केले होते. पुणे सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी फाटा येथे मांजरी फार्मजवळील मॅरेथॉन स्कूल आहे. पंचायत समिती हवेली गटशिक्षणाधिकारी यांना पुणे जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक)संजय नाईकडे यांनी या शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावेत. असे पत्र दिले होते . त्यानंतर हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.