Blog

मीटर बसविण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

हडपसर : हडपसरसाठीच्या पाणीपुरवठ्याच्या सहा योजना अर्धवट असून, दिवसेंदिवस पाणी समस्या गंभीर बनली आहे. आजही नागरिकांना टँकरच्या पाण्याची वाट पाहावी लागत आहे. हडपसर परिसरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हडपसर परिसरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मागिल सात वर्षांपूर्वी सहा ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. निधी आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे कामे रखडली आहेत. रात्री-अपरात्री कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणच्या नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. तरीसुद्धा प्रसासनाची मीटर बसविण्यासाठी लगीन सुरू झाली आहे. प्रशासनाने २४बाय७ पाणीपुरवठा योजनेची पुनर्पाहणी करून रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हडपसर परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते प्रशांत सुरसे व पल्लवी सुरसे यांनी दिला आहे.

हडपसर गावठाण, गाडीतळ परिसर मागिल ६० वर्षांपासून महानगरपालिकेत असून, सातववाडी, गोंधळेनगर, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर (१५ नंबर), आकाशवाणी, ससाणेनगर, काळेबोराटेनगर परिसर १९९७ पासून महापालिकेमध्ये समाविष्ट असला तरी या परिसरात रात्री-अपरात्री आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नोकरदार, व्यावसायिक महिला-भगिनींना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.

पालिका प्रशासनाने समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत हडपसरमध्ये २०१६-१८ पासून सहा पाणीपुरवठा योजना सुरू केल्या असल्या तरी, निधी आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे अर्धवट अवस्थेत आहे. प्रशासनाने तुकाईटेकडी-३५ लाख लीटर, हडपसर पीएमपी आगार ४५ लाख लीटर क्षमता, भुजबळ स्कीम (बडदे मळा) ३५ लाख लीटर क्षमता, आनंदनगर (आकाशवाणी) – ३५ लाख लीटर क्षमता, आनंदनगर (साधना विद्यालय)- ४५ लाख लीटर क्षमता अशा सहा ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना मागिल सात वर्षांपासून सुरू केली असूनही आजही अपूर्णावस्थेत आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असूनही पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने का पाहात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केल्याचे सुरसे यांनी बोलताना सांगितले.

यासाठी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची माजी आमदार मोहन जोशी, प्रशांत सुरसे यांच्या नेतृत्वाखाली महिला शहर उपाध्यक्षा पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर, सचिन नेमकर, गणेश जगताप, ऋषभ रणदिवे, संदेश भडकुंबे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन तातडीने पाणीसमस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे सुरसे यांनी सांगितले.

हडपसर गावठाण परिसरासह १९९७ साली पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांतील पाणीपुरवठा अद्याप विस्कळीत आहे. तरीसुद्धा पालिका प्रशासनाने मीटर बरविण्याचा घाट घातला आहे. आजही नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. महिला-भगिनींना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. प्रशासनाने पुरेसा आणि वेळेत पाणीपुरवठा करावा.
-पल्लवी सुरसे, उपाध्यक्षा पुणे शहर महिला काँग्रेस

Related Articles

Back to top button