Blog

माळवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल आंदोलन

हडपसर : येथील पोलिसांची दहशत राहिली नसल्याने चोरट्याचा, गुंडाचा, अवैध धंदेवाले यांचा त्रास नागरिकांना होत आहे. रात्री अपरात्री नागरिकांच्या घरावर दगडी मारले जातात. एवढी दहशत या गुंडांची तयार झाल्यामुळे माळवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल आंदोलन नागरिकांच्या वतीने घेण्यात आले.

माळवाडी या ठिकाणी रवी काळभोर यांच्या घरावर भर दिवसा दरोडा टाकण्याच्या हेतूने सात ते आठ जणांनी जीव घेना हल्ल यांच्या कुटुंबावर केला व त्यांच्या झटापटीमध्ये रवी काळभोर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्लेखोराने हल्ला करून त्यांना जखमी केले. त्या परिसरामधील अनेक सोसायट्यांमध्ये घुसून दहशत निर्माण करण्याचे काम नशा करून या चोरट्या मंडळींनी केले. या परिसरातील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या घरामध्ये लपून बसलेला चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

परंतु यामध्ये पाच ते सहा जणांची टोळी होती. बाकीचे पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले. माळवाडी परिसरामध्ये अनेक अवैद्य धंदे, दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, ताडीचे धंदे, ड्रग्स गांजा विक्री सरस चालू असल्यामुळे अनेक तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. व्यसनेच्या नादापाई तरुण वर्ग कोणत्याही थराला चाललेला आहे. यामुळे परिसरातील अनेक महिला तरुणी वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत ठेवून जगावे लागत आहे. अनेक वेळेस या गुंडांकडून गाड्यांची नाशदूस केली जाते.

या आंदोलनात ईशान चेतन तुपे, दादा तुपे, उल्हास तुपे, संतोष खरात, बाळासाहेब तुपे, तात्या तुपे, प्रशांत तुपे, रुपेश तुपे, दत्ता तुपे, विजय तुपे, संदीप तुपे, स्वप्निल तुपे, रवी काळभोर, शंतनू जगदाळे, अनिल तुपे, गणेश तुपे, नाना झेंडे, मंगेश तुपे बहिरट दाजी व शेकडो नागरिक या हल्लाबोल आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी झोन फाईव्ह डीसीपी राजकुमार शिंदे यांनी माळवाडी करांचे निवेदन स्वीकारून या भागातील अवैद्य धंदे त्वरित बंद करण्यात येतील. असे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button