Blog
बेलसर फाटा येथील अपघातात तीन जनांचा जागीच मृत्यु
जेजुरी,
जेजुरी पोलीस स्टेशन च्या हद्दीत बेलसर फाटा येथील अमित हॉटेल समोर ओव्हर ब्रिज नजीक भीषण अपघात झाला आहे. एस टी आणि दुचाकीच्या अपघाता मध्ये पारगाव मेमाणे येथील बोरमाळ वस्ती येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गुरुवार रोजी दुपारी ३ वा २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. दुचाकी वरील पारगाव येथील रहिवासी पांडूरंग दामोदर मेमाणे, रमेश किसन मेमाणे, संतोष दत्तात्रय मेमाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेत तात्काळ दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.