ड्रायव्हरला डुलकी लागली अन् अपघात
मुकेश वाडकर
हडपसर, ड्रायव्हरला डुलकी लागली अन् उड्डाण पुलावरील दुभाजकला मोटर कार धडकली.. मागून येणाऱ्या दुचाकी स्वार धडकल्याने दुचाकीवरील विद्यार्थी आणि मोटर कार मधील व्यक्ती जखमी झाले. हा अपघात वैभव टॉकीज समोर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.
.
मोटर कार मधील कंपनीचा कर्मचारी डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी , दोन्ही जखमींना खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.
कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
घटना स्थळी हडपसर पोलीस दाखल झाले .
पुणे सोलापूर महामार्ग वर हडपसर येथील वैभव टॉकीज समोर असलेल्या उड्डाणपुलाच्या दुभाजकाला ड्रायव्हर ला डुलकी लागल्याने मोटर कार आज सकाळी ६:२० मिनिटांनी धडकली . त्यामुळे आत बसलेल्या खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या ह्या अपघात मुळे मागून येणारा दुचाकी स्वार मोटार कारला धडकला.दुचाकी स्वार आणि त्यावरील तरुणी दोघेही जखमी झाले .
त्यांनाही जवळील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुचाकी स्वार दोन तरुण विद्यार्थी पोलीस भरती साठी सकाळी व्यायाम करण्यासाठी निघाले होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी घटना स्थळी भेट दिली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.