Blog

ग्लायडिंग सेंटर हस्तांतरण विरोधात मानवी साखळी

हडपसर : डी जी सी ए एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे 99 वर्षाच्या कराराने ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित होणार आहे. हस्तांतरण झाल्यास हडपसरच काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्लायडर शिकण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य तरुणांची संधी हिरावून घेतली जाणार आहे. याचा विरोधात आज मानवी साखळी चे आयोजन करण्यात आले.

सावली फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले . 1950साली तात्कालीन देशाचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शुभहस्ते चालू करण्यात आले होते . त्याकाळी संपूर्ण देशात सुमारे 18 ठिकाणी या प्रकारचे सेंटर उभारण्यात आली होती ,

परंतु कालपरत्ये त्यापैकी जवळपास 17 ग्लायडिंग सेंटर बंद पडलेली आहेत . संपूर्ण देशामध्ये एकमेव एकच हे ग्लायडिंग सेंटर कार्यान्वित असून आजपावेतो हजारो विमान प्रेमींनी या ठिकाणी ग्लायडर मध्ये बसण्याचा – वैमानिक होण्याचा बहुमान पटकावलेला आहे .

परंतु आता जर हे सेंटर एअरपोर्ट ऑफ इंडिया ला हस्तांतरित झाले तर खाजगीकरणा मुळे या ठिकाणी ग्लायडिंग सेंटर सुरू करण्याचा मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात येईल व सर्वसामान्य कुटुंबातील कोणीही तरुण वैमानिक होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही . त्यामुळे फक्त हडपसरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये असणारे एकमेव ग्लायडीग सेंटर है समस्त महाराष्ट्राचा अभिमान आहे . त्यामुळे हडपसर मधील नागरिकांनी यास आज मानवी साखळी करून या हस्तांतरणास विरोध दर्शवलेला आहे.

सदरचं निवेदन पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नागरी विमान उड्डाण मंत्रालय केंद्रीय मंत्री किंजरापु राममोहन नायडू तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ डी जी सी ए डीसी शर्मा यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे .

तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे . या मोहिमेमध्ये गेली चार-पाच दिवसांमध्ये जवळपास 6000 पेक्षा जास्त नागरिकांनी विरोध दर्शवण्यासाठी सह्या केलेल्या आहेत ,

लवकरच हडपसर परिसरातील शाळांमधून या ग्लायडीग सेंटरचे हस्तांतरण होऊ नये या कारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्ड पत्र लिहून पाठवली जाणार आहेत , या सर्वांचे आयोजन सावली फाउंडेशन योगेश ससाणे यांनी केले होते.

Related Articles

Back to top button