covernews
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6121मोठ्या प्रमाणात पाणी आजूबाजूच्या शेती करत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेले. त्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी वाडकर मळ्यातील शेतकरी गुलाब वाडकर तुषार वाडकर लक्ष्मण वाडकर यांनी केलेल्या आहेत. कंत्राट दराकडून निष्काळजीपणे काम होत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. शेतकऱ्यांनी यावर तीव्र नापसंती दर्शवित आपले नुकसान भरून देण्याची मागणी केलेली आहे.
भर उन्हाळ्यात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई चालू आहे. अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार दिवसाला पाणी येत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा लागत आहे. तसेच त्यांना पाणी देखील वेळेवर मिळत नाही.
पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. असे असताना महानगरपालिकेकडून अधिकारी वर्ग रस्ता तयार करणारे कंत्राटदार बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या फुटत असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे
अगोदरच उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असताना पुणे महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात नाही त्यातच अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपय होत असताना दिसत आहे. यावर पुणे महानगरपालिका लष्कर पाणीपुरवठा विभाग अडचणी कार्यालय तसेच वानवणीशे तरी कार्यालय याकडून या प्रश्नावर कशा पद्धतीने तोडगा काढणार जाणार आहे याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल.
होळकर मळ्यातील शेतीचे नुकसान करणाऱ्या
बेजबाबदार कंत्राट दारावर पुणे महानगर पालिका पाणीपुरवठा विभाग काय कारवाई करणार हे पहावी लागेल ?
तरोडे वस्ती ते कृष्णा नगर हा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सहा महिन्यापूर्वीच हा रस्ता पुणे मनपा डांबरीकरण केले होते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पुन्हा उघडला गेला. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले गेले.
पुण्याकडे जाण्यासाठी कृष्णा नगर वानवडी येथून जाणारा हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. परंतु कंत्राटदाराने आणि त्यावर लक्ष देणाऱ्या जेई ज्युनिअर इंजिनियर अभियंताने कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामाच्या बाबतीत दर्जा न ठेवल्यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडलेले आहे.
पालिकेचे पैसे त्यामुळे व्हायला जात आहे. पालिकेचं डांबर खाताय कोण ? असा सवाल आता नागरिक करत आहे.
Pune महानगरपालिकेची आणि टॅक्स भरणाऱ्या नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे , याला जबाबदार कोण ?
असा सवाल नागरिक करीत आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणारे कंत्राटदार याच्यावर कारवाई कधी होणार ? ज्या अभियंताने रस्ता तयार करताना लक्ष दिले नाही किंवा कामात कसूर केली त्याच्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिक करीत आहे.
जोपर्यंत पुणे मनपाचे अधिकारी आणि आणि कंत्राटदार यांची मिली भगत तोपर्यंत पुणे महानगरपालिकेतील टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या खिशावर दरोडा पडत राहणार अशी भावना या भागातील नागरिक अर्जुन सातव नाझीम शेख शराफत पानसरे निलेश वाडकर यांनी बोलून दाखवली आहे
]]>हडपसर मधील लिंगायत समाजाच्या दफन भूमीत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हडपसर माळवाडी येथे पुणे मनपाची अमर धाम स्मशान भूमी आहे त्याच्या शेजारी लिंगायत धर्माची दफन करण्यासाठी दफनभूमी आहे. या दफनभूमीला मागील बाजूने सीमा भिंत तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना नाही. या ठिकाणी गर्दुल्ले दारुडे व इतर समाजकंटक दिवसा येऊन रात्री अपरात्री येऊन या ठिकाणी धुडगूस घालतात. गांजा फुकतात, इंजेक्शनची नशा करतात. दारू पितात.त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच त्याचप्रमाणे इंजेक्शन सापडत आहेत.
डिसेंबर महिन्यात रात्री साडेअकरा वाजता बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारा खाजगी वखार वाला आणि त्याचा मालक त्याचे कर्मचारी यांच्यासमवेत पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी कंत्राटी सुरक्षा कामगार दारूची पार्टी करीत होते. तसेच मटणाची पार्टी ही जोडण्यात आली. यावेळी सदर सर्व घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्या ठिकाणी थातूरमातूर कारवाई करून प्रश्न मिटवण्यात आला. परंतु त्यानंतर ही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. सुरक्षा रक्षक नेमके करतात तरी काय ? ते नक्की कोणाची सुरक्षा करतात? कामावर हजर न राहता घरी जाऊन झोपा काढतात का काय? येथे येणाऱ्या समाजकंटकांबरोबर दारूच्या पार्ट्या मटणाच्या पार्ट्या झोड तात काय ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी देखील याची संपूर्ण चौकशी न करता दोषींना पाठीशी घालण्याचे पाप करीत आहे. यामुळे मुजोर आणि बेशिस्त कंत्राटी सुरक्षा रक्षकांना एक प्रकारे धुडगूस घालण्याचे दारू पार्टी जोडण्याचा परवानाच दिला नाही ना? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
मध्यंतरी कुत्र्याने जळलेल्या मृतदेहाचे लचके तोडण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावेळी स्मशानभूमीतील सुरक्षा आणि सुरक्षेचे कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते ?त्यावर देखील सुरक्षा विभागाकडून चौकशी झाल्याचे फक्त दिखावा करण्यात आला.
कोणावरही कारवाई करण्यात आली नाही . मुजोर कंत्राटी सुरक्षा रक्षकांना त्यामुळे विशिष्टपणा आणि मुजोरगिरी करण्याचे अभय मिळाले. आणि दारूच्या पार्टी बरोबर दिवसाही होऊ लागल्या आहे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
या दफनभूमीत सुरक्षारक्षक असताना कॅमेरे असताना दारुडे येतात तरी कसे? हा सवाल आहे. खाजगी बेकायदेशीर विनापरवाना वखार वाला या पार्ट्यांचे आयोजन करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या या वखार वाढल्यावर कारवाई होताना दिसत नाही
नागरिकांनी उपस्थित केलेले सवाल.
१)दफनभूमी दफन करण्यासाठी आहे की दारू पिण्यासाठी ?
२)येथे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेस शान फिरत असतात शांत ठिकाणी तळ ठोकून असतात सुरक्षारक्षक काय करतात मग सुरक्षारक्षक काय करतात?
३) पालिकेचे सुरक्षा अधिकारी मुकादम सहाय्यक सुरक्षा अधिकारी यांचे कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर नियंत्रण नाही का?
४) बेकायदेशीर विनापरवाना असलेल्या लाकूड वखारीला अतिक्रमनाला नक्की कोणाचे अभय आहे ?
५) स्थानिक लोकप्रतिनिधी, हडपसर क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण अधिकारी, मालमत्ता विभागाचे अधिकारी, की स्थानिक गुंड ,..?
6) दफनभूमीत रोज दारूच्या पार्ट्या होत असताना तसेच श्वान दिवसभर तळ ठोकून असताना अधिकारी कारवाई न करता कंत्राटी सुरक्षा रक्षकांना अभय देतात असे चित्र निर्माण झाले आहे, त्या सर्वांवर कारवाई होणार तरी कधी ?
हडपसर,
गेले तीन आठवड्यापासून 600 मिलिमीटर व्यासाची मैला पाणी मोहून घेणारी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आलेली आहे.ससाणे नगर हडपसर मुख्य रस्त्यावर सध्या दुचाकीस्वार अनेक वाहनचालक, पादचारी, महिला, वृद्ध, शाळकरी मुले मुली यांना प्रचंड त्रासात सामोरे जावे लागत आहे
अगोदरच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी असते. महंमदवाडी, हांडेवाडी, काळे बोराटे नगर, ससाणे नगर, अवताडे वाडी होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, सातव नगर, वाडकर मळा, ससाणे वस्ती सय्यद नगर अशा विविध भागात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.
त्याचप्रमाणे ससाणे नगर या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढल्याने या रस्त्याला मोठ्या प्रमाणात व्यापारी आलेली आहेत तसेच या रस्त्यावर राष्ट्रीयकृत बँका दवाखाने व्यापारी संकुले मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वरील बारावाड्यांकडे जाण्यासाठी हडपसरला येण्यासाठी हा एकमेव रस्ता उपलब्ध आहे.
1998 साली डीपी रस्ता मंजूर झाला सदर रस्ता 30 मीटर रुंदीचा आहे. परंतु या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. नागरिकांना पादचारी मार्ग उपलब्ध नाही. जे जागा मालक आहेत त्यांना पीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे
सध्या रस्त्यावर मैला पाणी वाहून नेण्यारी वाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराला अनेक वेळा सांगू नये ठेकेदार काम जलद गतीने पूर्ण करत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तीन आठवड्यापासून मी काम सुरू आहे काम अत्यंत संत गतीने चालू आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यातच त्याने माती आणून टाकल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात झूळ निर्माण झालेली आहे त्यामुळे येथील प्रदूषणात भर पडलेली आहे. ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होतच असते त्यातच भर म्हणून हे काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
ससाणे नगर नागरिक कुस्ती समितीने इशारा दिलेला आहे. आठ दिवसाचे काम जर थांबवले नाही. तर जनआंदोलन करून ही काम बंद पाडण्याची अशी माहिती असा नगर नागरिकत समिती आणि आधार प्रतिष्ठान यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांना दिलेली आहे.
]]>खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे कुख्यात गुंड टिपु पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडळ पोलीसांनी जेरबंद केले आहे
सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे येवून मागील तीन वर्षापासून रेकॉर्डवरील गुन्हेगार टिपू पठाण, व त्यांचा भाऊ इजाज पठाण यांनी त्यांचेसोबत ०७ ते ०८ साथीदारा सोबत घेवून बेकायदेशीर जमाव करुन वारंवार सय्यदनगर, हडपसर, पुणे येथील तक्रारदार महिलेल्या मालकीची सव्र्व्हे नंबर ७५/६ मधील १२९० स्के फुट मोकळ्या प्लॉटवर येवून, ही जागा माझी असुन, सदर जागा मी माझा भाऊ इजाज पठाण यांचे नावाने खरेदी केली आहे.
सदर जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून घ्या. नाहीतर जागा कशी खाली करुन ताब्यात घ्यायची हे मला चांगले माहिती आहे असे बोलुन, प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून त्यावर असलेले माझे नाव खोडून टिपू पठाण याने जागा पाहीजे असलेस २० लाख रुपयाची मागणी करुन आमचे सोबत वाद घालून जबरदस्तीने माझे प्लॉटया ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिल्याने काळेपडळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील रेकॉर्डवरील आरोपी रिझवान ऊर्फ टिषु सत्तार पठाण यांने कव्वालीचे कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्यांचेवर पोलीसांकडून प्रतिबंधक कारवाई करुन १४ दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा सहभाग निष्यन्न झाल्याने त्यास काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक नियुक्त करुन, तांत्रीक विष्लेशन व बातमीदारांमार्फत सव्यदनगर परिसरात शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सव्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफिने त्यास सव्यनगर रेल्वे पटरीच्या जवळ ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे असे असून त्यास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. असून न्यायालयाने त्याची दिनांक ०७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमुद गुन्ह्यात इतर आरोपींचा ०२ पथके नेमूण शोध घेवून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे
सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
]]>सोमनाथ संजय कांबळे (वय ३०, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो ही दारू विक्री करत होता. रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलीस ठाण्याच्या सुरक्षानगर चौकीतील अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्तावर असताना पोलीस हवालदार रुपाली ताकवले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता पोलिसांनी गोसावी वस्तीत छापा टाकला.
तपासादरम्यान, कांबळेच्या नायलॉनच्या पोत्यातून गावठी हातभट्टी दारू आढळून आली. तसेच पत्र्याच्या शेडच्या मागील भागात बेटशीटच्या खाली मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली दारू सापडली. पोलिसांनी एकूण ४५ हजार ३५० रुपयांची दारू जप्त केली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे तपास करीत आहे.
ज्येष्ठ नागरिक कुटूंबापासून लांब राहत असल्याचा फायदा घेवून, त्यास व्यसानाच्या आहारी नेवून २४ लाखांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक करणाऱ्या दोघांना हडपसर पोलीसांकडून अटक केली.
फिर्यादी स्नेहल अशोक झरेकर रा मगरपट्टा सिटी रोड, हडपसर सध्या रा- बैंगलोर कर्नाटक यांचे चहील अशोक शंकर हारेकर वय ६४ वर्ष यांचे अकाऊंन्ट चा ऑनलाईन अॅक्सेस घेवून वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करुन एकूण रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणुक केल्याने हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास संजय मोगले, यरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक, गुन्हे आणि अंमलदार संदीप राठोड, सचिन गोरखे, गायत्री पवार, तेजस पांडे असे करीत असताना, फिर्यादी यांचेकडून माहीती घेतली असता, फिर्यादी यांचे वडिल हे कुटूंबापासून वेगळे एकटेच राहत होते.
त्यांना दैनंदिन गरजेच्या कामामध्ये ते राहत असलेल्या ठिकाणी चाँचमन म्हणून काम करणारा हनीफ नावाचा इसम मदत करीत असलेबाचत माहीती प्राप्त झाली. फिर्यादी यांचे वडिलांचे अकाऊंन्टवरून ट्रांजेक्शन झालेले रक्कमेचायत बँकेकडून माहीती प्राप्त करून त्याची पडताळणी केली असता, ती रक्कम हफ्तीकार खान आणि नूर जहाँ यांचे बैंक अकाऊन्टयर ट्रांन्सफर झाल्याबाचत दिसून आले. तसेच वॉचमन म्हणून काम पाहणारा इसम हनीफ हा घटनेनंतर काम सोडून फरार झाला होता.
संशयीत इसमांचे मोबाईल नंबर हे बंद इाल्याचे दिसून आले. गुन्ह्याचे केले तांत्रिक तपासामध्ये हनीफ आणि इफ्तीकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असलेबाबत दिसून आले. संशयीत इसमाबाबत उपयुक्त माहीती गोळा करून पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, गायत्री पवार यांचे पथक गोवंडी, मुंबई येथे जावून त्यांनी केले तपासामध्ये आरोपी इफतीकार रहिमखान पठाण वय ३१ वर्षे, रा. रेहान पार्क, गौतम नगर, गोवंडी मुंबई त्यास ताब्यात घेतले.
आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडून हनीफ बाबत माहीती घेतली असता ती सध्या हांडेवाडी येथे राहत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. त्यावरून पोलीस अंमलदार अविनाश गोसाथी, कुंडलीक केसकर पांनी आरोपी मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर वय ५२ वर्षे, सध्या रा. म्हसोबा मंदिराचे पाठीमागे, गौरव दुबे यांचेकडे भाड्याने, काळेपडळ, मुळ रा.- पातूर, ता. पातुर जि. अकोला यास ताब्यात घेतले.
आरोपींकडे तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सांगीतले की, मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर आणि इफतीकार रहिमखान पठाण हे नात्याने एकमेकांचे मेव्हणे असल्याचे सांगीतले, तसेच मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर हा सिक्युरीटी म्हणून काम करीत असताना, त्यास अशोक झारेकर हे वेगवेगळी कामे सांगत होते त्यामुळे अशोक झरेकर हे एकटे राहत असल्याचाबत इफतीकार पठाण यास हनीफ मार्फत समजले होते.
त्यामुळे आरोपी यांनी आपसात संगनमत करून अशोक हारेकर यांचेसोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाचे आहारी नेवून, वेळोवेळी एकत्र बसून, त्यांचे मोबाईलचा व बँकीग अॅक्सेस घेवून, त्यांचे बैंक खात्यावरील रक्कम आरोपींनी स्वतःचे व आपले नातेवाईकांचे बैंक खात्यांवर परस्पर वळवून, रक्कम रुपये २४,४८,०००/- रुपयांची फसवणूक केल्याचे सांगीतले. आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास निलेश जगदाळे हे करीत आहेत.
]]>या प्रकरणात ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिच्या प्रियकरासह चौघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईच्या हद्दीत झाल्याने गुन्हा मुंबई पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटक राज्यातील असून, ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करते. सन २०२१ मध्ये तिची आरोपीशी समाजमाध्यमातून ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला जाळ्यात ओढले.
लग्न आणि प्रेमाचे आमिषाने तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली. दोघेही तिथेच एका हॉटेलमध्ये राहिले. या वेळी आरोपीने पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी कारने पीडितेला पुण्याकडे घेऊन निघाला. या दरम्यान आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी तरुणीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले. ही रक्कम देण्यासाठी पीडित तरुणीने कर्ज घेतले होते.
आरोपीने पीडितेकडून दोन महागडे मोबाइलदेखील घेतले. आरोपी आणि त्याच्या मित्रांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेने काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा कांदिवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
]]>कारवाईसाठी कायद्यात होणार दुरुस्ती…
दूध आणि तत्सम अन्नपदार्थातील भेसळ मानवी आरोग्याला घातक आहे. त्यामुळे अशी भेसळ मकोका’अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
अॅनालॉग चौज’ हा पदार्थ राज्यात कठिकाणी ‘अॅनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याची तक्रारी सदस्यांनी केल्या. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एक प्रकरण उघडकीस आले.
त्याअनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सुधीर मुनगंटीवार, विक्रम पाचपुते विविध विभागांचे बरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीरमध्ये ‘अॅनालॉग चीज’ त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, जनतेला तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा, पोर्टल विकसित करावे असे निर्देश पवार यांनी दिले.
]]>हडपसर , हडपसर , काळे पडळ, वानवडी पोलिस ठाण्याच्या
हद्दीतील हडपसर ससाणे नगर, काळे बोराटे नगर, चिंतामणी नगर , सय्यद नगर , महमंद वाडी, हांडेवाडी ,सातव नगर, रामटेकडी dp रस्ता या ठिकाणी ‘नो फेरीवाला क्षेत्र’ (नो हॉकर्स झोन) घोषित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे प्रत्यक्ष भेटीद्वारे केली आहे.
हडपसर ससाणे नगर , हांडेवाडी रस्ता ,सय्यद नगर रस्ता,महमद वाडी रस्ता, काळे बोराटे नगर रस्ता यासर्व रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर अतिक्रमण केले आहे. तसेच विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळ विक्रेते, टेम्पो मधून अनधिकृत विक्री करणारे त्याचबरोबर रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो.
पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नाही. याबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिस आयुक्तांची समक्ष भेट घेऊन या तक्रारी दिल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणींचा विचार करून हडपसर ससाणे नगर , संपूर्ण हांडेवाडी रस्ता, सय्यद नगर – महमद वाडी रस्ता , काळे बोराटे नगर रस्ता या सर्व रस्त्यावर ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्याकरिता स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे .तसेच शासनाच्या सर्व विभागाशी पत्र व्यवहार सुरू असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हडपसर ससाणे नगर नागरी कृती समितीने या अनुषंगाने हडपसर पोलिस स्टेशन, काळे पडळ पोलिस स्टेशन, हडपसर वाहतूक नियंत्रण विभाग, काळेपडळ वाहतूक नियंत्रण विभाग ,हडपसर क्षेत्रीय कार्यालय ,पुणे मनपा येथे मागणी पत्र सादर केले आहे .
]]>