covernews
domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init
action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6121या प्रकरणात ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिच्या प्रियकरासह चौघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईच्या हद्दीत झाल्याने गुन्हा मुंबई पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटक राज्यातील असून, ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करते. सन २०२१ मध्ये तिची आरोपीशी समाजमाध्यमातून ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला जाळ्यात ओढले.
लग्न आणि प्रेमाचे आमिषाने तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली. दोघेही तिथेच एका हॉटेलमध्ये राहिले. या वेळी आरोपीने पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी कारने पीडितेला पुण्याकडे घेऊन निघाला. या दरम्यान आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला.
आरोपी एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी तरुणीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले. ही रक्कम देण्यासाठी पीडित तरुणीने कर्ज घेतले होते.
आरोपीने पीडितेकडून दोन महागडे मोबाइलदेखील घेतले. आरोपी आणि त्याच्या मित्रांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेने काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा कांदिवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
]]>छापा कारवाईमध्ये एका इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव विकांत राजकुमार जाधव, वय २२ वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभा स्पर्श अपाटमेंट, फ्लॅट नं. १०२, ससाणे नगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले.
ठिकाणावरुन ८० गॅस टाक्या वजनकाटा, गॅसट्रान्सफर पाईप असा एकुण १,३०,४३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.
कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रविण काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
]]>शिरूर : ऊसतोड कामगारांच्या कोपीमध्ये भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कोपीत झोपलेले ऊसतोडण कामगार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास नीर्वी येथील कणसे वस्ती येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरवरला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. गणपत कचरू वाघ (वय-४६ वर्ष), शोभा गणपत वाघ (वय-४१ वर्ष दोघे रा. ममदापुर, ता. येवला, जि. नाशिक) असं मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दीपक गणपत वाघ (वय-19 वर्षों, धंदा मजुरी, रा. ममदापूर, ता. येवला, जि. नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राहूल अण्णा सोनवणे (रा .निर्वि, ता. शिरूर) असं अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वी येथील कणसे वस्ती येथे कॅनल पट्टी जवळ फिर्यादी यांच्या आई-वडिलांची कोपी असून ते ऊस तोडणी करिता या भागात आले होते. १५ डिसेंबर रोजी जेवण करून मयत पती-पत्नी त्यांच्या कोपीमध्ये झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर नंबर एम एच १२ ई बी ४५५८ निष्काळजीपणाने, भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांचे आई-वडील राहत असलेल्या कोपीत घातला.
या घटनेत ट्रॅक्टरचे चाक फिर्यादी यांचे वडिल गणपत वाघ यांच्या पोटावरून गेल्याने तसेच आई शोभा वाघ यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शिरूर पोलिसांनी फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत.
]]>पुणे: सिंहगड रस्ता पोलिसांनी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले, तसेच काडतुसे जप्त करण्यात आली. साजन विनोद शहा (वय १९), कुणाल शिवाजी पुरी (वय १८, दोघे रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहा आणि पुरी यांच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल आहेत.
रविवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला धायरीतील अंबाईदरा परिसरात गस्त घालत होते. शहा आणि पुरी यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. दोघांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.
]]>याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास पांडुरंग हिंगणे, संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गावातील डांगमाळ आळीतील एका घरात पत्यांवर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे.
]]>त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाची माहिती दिली. तसेच आतापर्यंत तपास कुठवर आला आहे? किती आरोपींना अटक केली आहे? याबाबतची माहिती देखील दिली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस व क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. सुपारी देणाऱ्यासही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर चालू आहे. क्राईम ब्रँच व स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घटना घडल्यापासून आतापर्यंत वेगवेगळी पथकं काम करत आहेत. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी आतापर्यंत ४५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्याचदरम्यान त्यांनी एक गाडी शोधून काढली. सतीश वाघ यांचं अपहरण करण्यासाठी व हत्या केल्यानंतर पलायन करण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या कारपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या कारच्या मदतीनेच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. झोनल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केला आहे. आम्ही आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करत आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीस मेहनतीने काम करत आहेत.
]]>पिंपरी- चिंचवड : शहरामध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे नऊ किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी- चिंचवड शहरात गांजा विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर आहे. याच अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी नऊ किलो गांजा जप्त केला आहे. सूरज पंडित पवार, हफिजअली मेहबुबअली सय्यद आणि मोहिनी आनंद जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे अंमली पदार्थ विरोधी पथक हे गस्त घालत होत. पथकातील पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांना माहिती मिळाली की दोन संशयित सुरज पंडित पवार आणि हफिजअली मेहबूबअली यांच्याकडे गांजा आहे. त्यांना ताब्यात घेऊन सुरज च्या घरी तीन किलो ७२२ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला. दोन मोबाईल देखील मिळाले.
दुसऱ्या कारवाईमध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला संशयितरित्या मोहिनी जाधव ही महिला थांबली होती. मोहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मोहिनीच्या घरी देखील चार किलो गांजा पोलिसांना मिळाला. दोन्ही कारवाई मध्ये सुमारे नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
]]>विश्रांतवाडी; माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. टिंगरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असे निष्पन्न झाले आहे. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीसांनी रेवण तानाजी लगस (वय-20, रा. गोकुळ नगर, कात्रज) प्राणजीत अच्युत शिंदे (वय-24. रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी फिर्याद दिली होती.
धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत टिंगरे दांपत्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक (दि. 19 नोव्हेंबर) रोजी धानोरी महावितरण कार्यालयासमोर गाडीत बसले होते त्यावेळी दोन जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यादरम्यान, त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण करण्यात आली, अशी तक्रार रेखा टिंगरे यांनी दिली होती. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप रेखा टिंगरे यांनी केला होता. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी दोन आरोपींनी अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी हल्ल्याचे कारण सांगताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात प्रवेश केल्यामुळे दगडफेक केल्याचे कबूल केले आहे.
]]>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजू पंधारे (वय-४८, रा. भारती विद्यापीठ) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालविली जाते. या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता. याठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. गेल्या चार वर्षांपूर्वी पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. त्याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले होते.
पोलीस भरतीच्या आमिषाने त्याने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे करत आहेत.
]]>