Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the covernews domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/functions.php:6121) in /home2/websb8zq/navmaha.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
मनोरंजन https://navmaha.com Mon, 16 Dec 2024 13:44:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://navmaha.com/wp-content/uploads/2024/12/cropped-23-2-32x32.jpg मनोरंजन https://navmaha.com 32 32 नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक https://navmaha.com/?p=9145 Fri, 06 Dec 2024 12:06:42 +0000 https://navmaha.com/?p=9145

आज ‘महापरिनिर्वाण दिन’. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झालं. त्यामुळे या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना स्मरणार्थ ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा केला जातो. या दिवशी मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचतात. सध्या सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकार मंडळी पोस्ट करून बाबासाहेबांना अभिवादन करताना दिसत आहेत. अशातच ‘झी मराठी’वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेतील अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर २३ डिसेंबरपासून ‘लक्ष्मी निवास’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया नाईक, दिव्या पुगावकर असे बरेच कलाकार झळकणार आहेत. या मालिकेत देवकी म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीनाक्षी राठोड पाहायला मिळणार आहे. याच मीनाक्षी राठोडने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्येच मीनाक्षीने लेक याराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये यारा ‘माझा भिमराय’ गाणं गाताना दिसत आहे. यात यारा गाण्यातील प्रत्येक शब्द स्पष्टपणे गाताना पाहायला मिळत आहे. याराच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहते याराचं कौतुक करत आहेत.

https://www.instagram.com/reel/DDOfUfrzoZl/?utm_source=ig_web_button_native_share

दरम्यान, मीनाक्षी राठोडचा पती, अभिनेता कैलास वाघमारे आहे. १० मे २०२२ रोजी मीनाक्षी आणि कैलासला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर चार महिन्यांनी दोघांनी त्यांच्या गोंडस लेकीचं ‘यारा’ असं नाव ठेवलं. यारा आता अडीच वर्षाची आहे.

मीनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत मीनाक्षीनं साकारलेली निता सुर्वेची भूमिका सुरुवातीला अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारली होती. हे पात्र शर्मिष्ठाने आपल्या अभिनयाने एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. पण मीनाक्षीनं शर्मिष्ठानंतर निता पात्र उत्कृष्टरित्या पेललं. अजिबात तिनं निता पात्रातील बदल जाणवू दिला नाही. याआधी मीनाक्षी राठोडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत देवकीचं पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. पण काही काळानंतर मीनाक्षीनं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सोडली. मात्र तिनं साकारलेली देवकी अजूनही प्रेक्षकांच्या मनात अढळ आहे.

]]>
हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा https://navmaha.com/?p=9139 Fri, 06 Dec 2024 12:01:38 +0000 https://navmaha.com/?p=9139

‘यो यो हनी सिंग : फेमस’ या डॉक्युमेंटरी फिल्मची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या फिल्मद्वारे भारतीय हिप-हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअर उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोझेस सिंग यांनी केले आहे. ऑस्कर पुरस्कारविजेत्या निर्माता गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसद्वारे ‘यो यो हनी सिंग : फेमस’ची निर्मिती करण्यात आली आहे.

सिख्या एंटरटेन्मेंटचे निर्माते गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “यो यो हनी सिंग : फेमस’द्वारे आम्ही त्याच्या कथेतील खऱ्या पैलूंना उजाळा देत आहोत. त्याला मिळालेल्या यशापासून ते त्याचा संघर्ष आणि यशस्वी पुनरागमनापर्यंतचा हा प्रवास त्याची जिद्द, नवी सुरुवात आणि प्रामाणिक सत्य यांचा अनुभव देतो.”

कुठे आणि कधी पाहता येणार हनी सिंगची डॉक्यू-फिल्म

हनी सिंगवरील ‘यो यो हनी सिंग : फेमस’ ही डॉक्यू-फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही डॉक्यू-फिल्म २० डिसेंबर २०२४ पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हनी सिंगवरील डॉक्यू-फिल्मचे दिग्दर्शक मोझेस सिंग म्हणाले, “हनी सिंगने या एका आयुष्यात इतके काही अनुभवले आहे, जे अनेक आयुष्यांतही क्वचितच घडतं. या चित्रपटामध्ये प्रेम, दु:ख, कुटुंब, यश, अपयश, मानसिक आरोग्य व प्रसिद्धी यांचा समावेश आहे. हा चित्रपट त्याच्या प्रवासाच्या अनेक टप्प्यांवर प्रकाश टाकतो आणि भारतीय हिप-हॉप संस्कृतीवर झालेल्या त्याच्या क्रांतिकारी प्रभावाचे दर्शन घडवतो.”

‘यो यो हनी सिंग : फेमस’ या डॉक्यू-फिल्ममध्ये त्याच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे किस्सेही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना हनी सिंगने यापूर्वी म्हटले होते, “मी माझ्या वैयक्तिक आणि करिअरमधील समस्या माध्यमांमध्ये मांडल्या आहेत; पण कधीच मनमोकळेपणानं सर्व काही सांगितलं नाही. माझ्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आणि त्यांना माझी पूर्ण कथा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ही नेटफ्लिक्स डॉक्यू-फिल्म माझं जीवन, माझं बालपण आणि माझा सध्याचा संघर्ष यांचा प्रामाणिक आलेख मांडेल.”

हनी सिंगने यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक हिट गाण्यांना संगीत दिले आहे. त्यामध्ये ‘लुंगी डान्स’ (चेन्नई एक्स्प्रेस), ‘आता माझी सटकली’ (सिंघम रिटर्न्स), ‘आज ब्लू है पाणी पाणी’ (यारियां) या गाण्यांचा समावेश आहे.

]]>