आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण
Gold Silver Price Today : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,६७५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०.७८० रुपये प्रति किलो आहे. आज सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी १७० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता तर चांदीचा दर ९५,०१० रुपये प्रति किलो होता.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,५३० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७६,९३० रुपये आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे. |
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा असतो?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.