आरोग्य

यांच्या नावावर 69 वर्षीय जेष्ठ भारतीय आयर्नमॅन रेकॉर्ड

हडपसर, बहारीन ( मध्य पूर्व ) येथे पार पडलेल्या आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेत नवनाथ रघुनाथ झांजुर्णे हे आयर्न मॅन झाले. या विजयामुळं 69 वर्षीय आता सर्वात जेष्ठ भारतीय आयर्नमॅन म्हणून त्यांच्या नावावर रेकॉर्ड झाले आहे .

मागच्या वर्षी तुर्कस्तान ला झालेल्या याच स्पर्धेतून काही कारणामुळे त्यांना आयर्नमॅन हा किताब मिळाला नव्हता . चैतन्य वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिथं ते कमी पडले होते त्या कच्च्या गोष्टी सुधारायाला सुरुवात केली . जस कि वयामुळं त्यांचे स्नायू बारीक आणि अशक्त झाले होते ते स्नायू त्यांनी रोज जिम मध्ये हेमंत या पर्सनल ट्रेनर कडून तयार केले . स्विमिंग कच्च होत त्यासाठी हिंजवडी येथील कसारसाई या धरणात जाऊन रेगुलर ओपन वॉटर स्विमिंग ची प्रॅक्टिस केली .

दर रविवारी सोलापूर रोड ला लॉन्ग डिस्टन्स सायकलिंग साठी जाऊन लगेच आल्या आल्या सायकल पार्किंग ला लावून लगेचच अदिती गार्डन ला पळायला सुरुवात केली . श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम केला . रेस चा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरु केले .

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरु केला . सायकल चा हॅन्डल पकडायला अंगठ्याची फार गरज असते. पण त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला .त्यामुळं हॅण्डल ला ग्रीप पकडता येत नाही . त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडल्यामुळे आणि ते नीट न बसवल्यामुळे त्यांना वाकडा कोपर आहे . या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंग ला फार अडचणी येतात . वयाप्रमाणे त्यांना लांबचे दिसायला अंधुक दिसते .

2 वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले . तरीही त्यांनी या अडचणींवर मात करून त्यांनी हे मेडल मिळवले. बहारीन मध्ये डॉ स्मिता राहुल झांजुर्णे यांनी सुद्धा त्यांच्या सासऱ्यांबरोबर स्वतः च 6 वे आयर्नमॅन मेडल मिळवलं. साडे आठ तासात ज्या वेळी रेस संपवत फिनिश लाइन कडे येऊ लागले तेंव्हा निवेदकाने उद्घोषणा केली कि 69 वर्षीय एक भारतीय फिनिश लाइन कडे येत आहे त्यावेळी खरंच अंगावर काटा आला .

तिरंगा हातात घेऊन फिनिश लाइन क्रॉस करून , आयर्नमॅन हा किताब मिळवला . चौकट -70.3 आयर्नमॅन म्हणजे : एका दमात केलेलं 1.9 किलोमीटर समुद्रातील स्विमिंग +89 किलोमीटर सायकलिंग +21 किलोमीटर रनींग

Back to top button